ताज्या बातम्यामाढा-करमाळारणसंग्रामराजकीयसोलापूर जिल्हा

करमाळा विधानसभेची मदार छत्तीस गावांवर, कुर्डूवाडीच्या मतदारांवर उमेदवारांचं विशेष लक्ष; सर्वच उमेदवार उधळतायत आश्वासनांची मुक्ताफळे

जनसंवाद विशेष प्रतिनिधी : करमाळा माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघाची मदार माढा तालुक्यातील छत्तीस गावाच्या मतदारावर असून करमाळ्याचा भावी आमदार निवडून देण्याची ताकद येथील मतदाराकडे असल्यामुळे प्रमुख चार उमेदवारांनी गाव-वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या.

जनसंवाद दिनदर्शिका जाहिरात

तर कुर्डूवाडी जंक्शनवर विशेष लक्ष देण्यासाठी उमेदवारांनी निष्ठावान आणि आयात करून पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लावलेले आहेत.

 

सन २००९ पासून माढ्यातील छत्तीस गावे कुर्डूवाडीसह लहू, अकुलगाव, शिंदेवाडी, सापडणे, घाटणे, भोसरे, बारलोणी, महादेववाडी, गवळेवाडी, भोगेवाडी, जाखले, चौभेपिंपरी, ढवळस, कव्हे, शिंगेवाडी, नाडी, मुंगशी, लोणी, बिटरगाव, रोपळे, तांदूळवाडी, रिधोरे, पापनस, तडवळे (म), म्हैसगाव उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव, निमगाव, बादलेवाडी, शेडशिंग, पिंपळखुंटे,अंबड, कुर्डू ही गावे करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत.

 

यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांनी कुर्डूवाडी सहज छत्तीस गावांवर फोकस केला असताना. विद्यमान आ.संजयमामा शिंदे, माजी आ.नारायण पाटील, दिग्विजय बागल, प्रा.रामदास झोळ यांनी आश्वासनाची मुक्ताफळे उधळत केवळ कुर्डुवाडीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

कुर्डूवाडीतील नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, स्वयंघोषित छोटे-मोठे नेते तन-मन धन के साथ मामासाठी पायात भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत.पण जनतेच्या मनात काय चाललं हे मतदानादिवशी समजणार आहे. तर आबा, सर, प्रिन्स पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे अचानक विधानसभा निवडणुकीत कुर्डूवाडीच्या जनतेसमोर मताची झोळी पसरत आहेत.

करमाळ्याचा आमदार छत्तीस गावानी २००९ पासून निवडून दिला. तीन विधानसभा निवडणुकामध्ये उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. यंदाच्या चौथ्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ३९ उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ १५ अर्ज वैद्य ठरले.

 

वास्तविक पाहता यंदाच्या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवारांपैकी विद्यमान आ. संजयमामा शिंदे आणि माजी आ.नारायण पाटील हे तगडे अनुभवी राजकीय मल्ल करमाळा विधानसभेचे मैदान मारण्यासाठी सज्ज आहेत. तर नवखे दोन उमेदवार दिग्विजय बागल आणि प्रा.रामदास झोळ यांची कसोटीची निवडूक असणार आहे.

 

यंदाच्या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवार वगळता अन्य हौशी ११ उमेदवार मला आमदार झाल्यासारखं वाटतयच्या नादात नशीब आजमावत आहेत. देशाच्या स्वतंत्र्योत्तर काळापासून करमाळा विधानसभा मतदार संघातील स्व.नामदेवराव जगताप यांच्या प्रति असणाऱ्या निष्ठेचा आणि पक्षीय राजकारणामुळं जनतेच्या मनाचा अचूक ठाव त्यांच्यापेक्षा अधिक आजपर्यँत कोणाला घेता आला नाही.

 

तरी देखील स्व.माजी मंत्री दिगंबरराव बागल यांची लोकप्रियता वाढली होती. सन १९५२ पासून २००४ पर्यंत १६ निवडणुकासाठी करमाळ्याच्या जनतेने आमदारांना निवडून दिलं. जगताप आणि बागल वगळता करमाळ्याचा सलग दोनदा आमदार होण्याचा मान मिळाला नसून यंदा संजयमामा संधी साधणार का? याविषयी चर्चा रंगु लागल्या आहेत. यावेळीची निवडणूक आबा, मामा यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर सर आणि प्रिन्स यांचं राजकीय खातं उघडून भविष्य ठरवणार आहे.

 

कुर्डूवाडीतील नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, स्वयंघोषित छोटे-मोठे नेते तन-मन धन के साथ मामासाठी पायात भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत.पण जनतेच्या मनात काय चाललं हे मतदानादिवशी समजणार आहे. तर आबा, सर, प्रिन्स पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे अचानक विधानसभा निवडणुकीत कुर्डूवाडीच्या जनतेसमोर मताची झोळी पसरत आहे.

०००

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा
9421756655  |  9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button