ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळारणसंग्रामराजकीयसरकारी योजनासोलापूर जिल्हा

Big Breaking: माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार 

आमदार निधी, ग्रामपंचायत ५ टक्के निधीचा बोजवारा; अंत्योदय योजनेपासून दिव्यांग वंचित.

जनसंवाद न्युज नेटवर्क: गत आठवड्यात प्रहार शेतकरी संघटनेने अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठींबा जाहीर केला. परिणामी माढा तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी याबाबत संशय उपस्थित करून टेंभूर्णी येथे बैठक घेऊन मतदानाबाबत तटस्थ भूमिका घेतली होती. दिव्यांग संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.

प्रहार शेतकरी जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या आ.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम पंधरा वर्षांपूर्वीच प्रहार दिव्यांग संघटनेची मुहूर्तमेढ बच्चूभाऊंनी रोवली होती.आमच्या दिव्यांगांच्या भावना विचारात न घेता समाजात नेहमीच दुर्लक्षीत घटक म्हणून ओळखला जाणारा दिव्यांग हा माढा मतदारसंघात तीन हजारांहून अधिक संख्याबळ आहे. दिव्यांगांना काही ठराविक लाटे बहाद्दरांच्या दुटप्पी भूमिकेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. – माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, प्रहार दिव्यांग संघटना

 टेंभुर्णी येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष,जिल्हा सचिव यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली असता ज्या तत्कालीन प्रस्थापितांनी दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले असतील तसेच भविष्यात विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. अशा आशयाचे पत्र त्यांनी स्व:हस्ताक्षरात लिहून देणाऱ्या उमेदवाराला संघटनेचे पत्र न देता उमेदवारास तोंडी अथवा पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर करावा असे सांगितले.

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे, दत्तात्रय चौगुले तसेच जिल्हा सचिव संजय जगताप यांनी खुलासा करीत सांगितले आहे की,आ.बच्चूभाऊंनी राज्यातील दिव्यांग संघटनेच्या प्रत्येक तालुकाध्यक्षाला आप-आपल्या मतदारसंघात पाठिंबा देण्याचे स्वातंत्र्य दिले असून, प्रहार शेतकरी जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या एकाच छताखाली कार्यरत असल्या तरीही प्रहार दिव्यांग संघटनेने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. असे दिव्यांगांच्या बैठकीला फोनद्वारे सांगितले. वरीष्ठ पदाधिकारी व माढा तालुक्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रहार सेवकांनी यावेळी भविष्यात आपली अशी फसगत कोणी करू नये तसेच दिव्यांग संघटनेची पारदर्शकता टिकवण्यासाठी माढा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे घोषित केले आहे.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,उपाध्यक्ष गोरख देवकर,महिला तालुकाध्यक्ष पुनम दाभाडे,मंदा गोरे,आबा जगताप,माळशिरस तालुकाध्यक्ष सोमनाथ पारसे,नामदेव सावंत,गिता लादे,महाविर मुटकुळे,प्रविण पाटील,अनिल जगताप,रणजित ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या पाठींब्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. माढा मतदारसंघातील दिव्यांगांना आम्ही फोनद्वारे संपर्कात असून, दिव्यांग संघटनेने अद्याप कोणालाही पाठींबा दिला नसल्याचे सांगून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे हे स्पष्टपणे सांगत आहे.– गोरख देवकर (प्रहार दिव्यांग संघटना माढा तालुका उपाध्यक्ष).

.

आम्हाला दरमहा १५०० रूपये मिळणारी संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन तीन महिन्यांपासून मिळाली नाही. आम्ही सर्वजण खडतर आयुष्य जगत आहोत.एकच जमेची बाजू झाली होती ती म्हणजे माढा-करमाळा तालुक्यात दिव्यांग तपासणी व ऑनलाईन प्रमाणपत्र वाटपासाठी ग्रामीण रूग्णालयात शिबिरासाठी आ.संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. संजयमामा शिंदे यांच्यामुळे एकाच छताखाली प्रमाणपत्र तसेच रेल्वे पासची सुविधा आम्हाला मिळाली. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारण्याची तेवढी दिव्यांगांची हेळसांड थांबली. हे आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. तरीही आमच्या विविध समस्यांबाबत आम्ही सर्वजण बहिष्कारावर ठामचं आहोत – पुनम दाभाडे (महिला तालुकाध्यक्ष)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button