प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी इतर कंपन्यांना परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर केंद्र चालकांना नवीन संधी. – Jansanvad
कृषीताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळाराष्ट्रीयव्यापारसरकारी योजनासोलापूर जिल्हा

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी इतर कंपन्यांना परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर केंद्र चालकांना नवीन संधी.

शेतकरी आणि केंद्र चालकांसाठी NeoByt Fintech वरदान ठरणार.

PMFBY- प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2024

जनसंवाद न्युज नेटवर्क / सोलापूर : पीक विमा (Crop Insurance) हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग असल्याने प्रधानमंत्री फसल बिमा (PM-FBY) हा शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्षानुवर्ष शेतकरी न चुकता पीक विमा भरतो. कुणाला किती प्रमाणात पीक नुकसान भरपाई मिळते हा विषय थोडा गुंतागुंतीचा असल्याने त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु सततची नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून पिकांचे होणारे प्रचंड नुकसान पाहिले तर पीक विमा करणे शेतकऱ्यांना क्रमप्राप्त ठरते.

 

शासनाने १ रुपयात पीक विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. पीक विमा भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर हा एकमेव पर्याय असल्याने सर्व्हरवर जास्त भार (Load) येऊन सर्व्हर डाऊन झाले असल्याचे वारंवार अनुभव येत होते. सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांपेक्षा जास्त त्रास केंद्र चालकांना होत होता. फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी रात्र-रात्र जागावे लागत असे. मात्र नवीन निर्णयामुळे केंद्र चालकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे.

 

धोरणात काय केला आहे नवीन बदल: 

सर्व्हर डाऊनची समस्या सोडविण्यासाठी सरकारने सर्वच विमा कंपन्यांना पीक विमा स्विकारण्यास परवानगी दिली आहे. विमा कंपन्यांनी कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी नवीन कंपन्या नियुक्त केल्या आहेत. पूर्वी फक्त कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येच शेतकऱ्यांना अर्ज करावा लागत असे. आता अन्य कंपन्यांच्या केंद्रातही शेतकरी पीक विमा भरू शकणार आहेत.

 

देशातील सर्वच विमा कंपन्यांना पीक विमा स्वीकारण्याची परवानगी दिल्याने ठराविक कंपन्यांची एकाधिकारशाही संपली आहे. अनेक कंपन्या आल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेळेत आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी विमा कंपन्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ आणि पीक विमा भरण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे दिसून येते.

 

पीक विमासाठी नवीन विमा कंपन्या बाजारात उतरल्या खऱ्या पण शेतकऱ्यांना विमा सेवा देण्यासाठी कुशल मनुष्यबळ पुरवणार कोण हा प्रश्न प्रत्येक विमा कंपनीसोबत होता. यामध्ये डिजीसेफ या कंपनीसोबत निओबाईट फिनटेक (NeoByt Fintech) ही ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपनी संपूर्ण देशभरात सेवा पुरवीत आहे.

 

निओबाईट फिनटेक (NeoByt Fintech) ने निओ बडी (Neo Buddy) या नावाने मोबाईल ॲप लॉन्च करून अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. फक्त पीक विम्यावरच अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र चालकांना बँकिंग सेवा, इन्शुरन्स, लाईट बिल भरणा, फासटॅग (Fastag), NPS सारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याचेही कार्य केले आहे. त्यामुळे ऑनलाईन क्षेत्रात येऊ पाहणारे नव व्यावसायिक आणि ऑनलाईन व्यवसायात स्थिर-स्थावर असलेल्या इंटरनेट कॅफे, महा ई सेवा, सीएससी केंद्र चालकांना Neo Buddy उत्पन्नाचे नवीन साधन बनत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बिमा (PM-FBY योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीप्रमाणे धावपळ करावी लागणार नाही. सरकारच्या नवीन धोरणामुळे अनेक विमा कंपन्यांना संधी मिळाल्याने एकाच ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपनीवर येणारा ताण कमी होऊन सर्व्हर डाऊनच्या (Server Down) समस्येतून शेतकऱ्यांना तर मुक्ती मिळेलच शिवाय केंद्र चालकांचाही वेळ वाचणार आहे हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button