गुन्हेगारीताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळासोलापूर जिल्हा

Drink & Drive: दारू पिऊन वाहन चालवणारांकडून २ लाख ३० हजार वसूल.

सोलापूर पोलीस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे यांची नजर आता तळीरामांकडे. जिल्ह्यात Drink & Drive निशाण्यावर.

जनसंवाद/टेंभुर्णी : रस्ता अपघातामध्ये वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याने अनेक अपघात झाले असल्याचे आपण नेहमी पाहतो. नागरिकांतून नेहमी याबाबत तक्रारी असतात. परंतु Drink & Drive प्रकरणी क्वचित प्रसंगी कारवाई होत असल्याचे दिसून येत असे. मात्र कल्याणी नगर येथील अपघातामध्ये दोन तरुण तरुणीला विनाकारण जीव गमवावा लागला. त्यावेळी उभा महाराष्ट्र हळहळला. Drink & Drive चे परिणाम समोर आले. आणि याच प्रकरणानंतर सर्वांचे डोळे खाडकन उघडले.

 

Drink & Drive मुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो याची प्रचिती आल्यानंतर Drink & Drive वर पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे अचूक हेरून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

हायवेवर होत असलेल्या अपघाताला जबाबदार बेशिस्त वाहतूकीसोबतच Drink & Drive चा ही सिंहाचा वाटा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दिपक पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू आहे. दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास १० हजार रुपये दंड ठोठावला जातोय. मोटरसायकल, कार, ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहन चालकांवर टेंभुर्णी (ता.माढा) येथे कारवाई जोमात सुरू असून तळीरामांनी कारवाईची धास्ती घेतली आहे.

 

२४ तारखेपासून टेंभुर्णी पोलीस स्टेशन वाहतूक विभागाचे स.पो.फो. राजेंद्र डांगे, सचिन साळुंके, वैभव राऊत यांच्या पथकाने वाहन चालवताना दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईमध्ये आतापर्यंत २३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण २ लाख ३० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे जनतेतून स्वागत करण्यात येत असून कारवाई करण्यात आलेल्या तळीरामांच्या फोटोसह नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्यास Drink & Drive वर पायबंद घालण्यास मोठी मदत होईल असा जनतेचा कयास आहे.

०००

जनसंवादकडून आवाहन – आपल्या परिसरात जर कुठे भोंदूगिरी सुरू असेल तर पुराव्यासह आम्हाला कळवा.

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क ९५२७२७१३८९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button