ताज्या बातम्यामाढा-करमाळा
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे यांची निवड.
महाराष्ट्रा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालय इंदापूर या ठिकाणी दिनांक २२ रोजी कार्यकर्ता मेळावा जाहीर पक्षप्रवेश व नूतन पदाधिकारी निवडी असा कार्यक्रम पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर नूतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
करमाळा तालुक्यातून ही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर पक्षप्रमुख माननीय संजय भैय्या सोनवणे यांनी करमाळा तालुक्यात गेली २० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत निस्वार्थीपणे काम करणारे तालुक्यातील जनतेशी दांडगा जनसंपर्क असणारे अभ्यासू प्रशासनाची माहिती असणारे व प्रशासनावर वचक असणारे सर्वसामान्यांचे काम करून घेण्याची धमक असणारे एक धाडसी नेतृत्व लक्षात घेता वडशिवने गावचे रहिवासी असलेले ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे यांची करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड केली. तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन काकडे यांना पक्ष वाढीसाठीच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
करमाळा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीला गोरगरीब जनतेची निस्वार्थपणे काम करणाऱ्या अभ्यास व धाडसी व्यक्तीची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने तालुकाध्यक्षपदी निवड केल्यामुळे करमाळा तालुक्यातील अधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी मित्रपरिवार व जनतेतून ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.