अक्कलकोटताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमंगळवेढामहाराष्ट्रमाढा-करमाळामाळशिरसमोहोळराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : कोणत्या मतदार संघात मतदान केंद्र किती? मतदार संख्या किती? सविस्तर माहिती

  • जिल्हा निवडणूक प्रशासन मतदान घेण्यासाठी सज्ज
  • बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन
  • जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 738 मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना

सोलापूर, दिनांक 19(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या अधिचनेद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला होता त्या अनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 738 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहेत. ही मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघ निहाय मतदान केंद्र व मतदार संख्या-

मतदार संघ 244-करमाळा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 347, मतदार -पुरूष 1 लाख 71 हजार 515, महिला- 1 लाख 57 हजार 468, तृतीयपंथीय -11, एकुण 3 लाख 28 हजार 994, सैनिक मतदार-467, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 705.

 

मतदार संघ 245-माढा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 355, पुरूष 1 लाख 83 हजार 948, महिला- 1 लाख 68 हजार 740, तृतीयपंथीय -03, एकुण 3 लाख 52 हजार 691, सैनिक मतदार-355, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 186.

 

मतदार संघ 246-बार्शी, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 333, पुरूष 1 लाख 73 हजार 453, महिला- 1 लाख 64 हजार 2, तृतीयपंथीय -44, एकुण 3 लाख 37 हजार 499, सैनिक मतदार-563, 85 वर्षावरील मतदार- 6 हजार 839.

 

मतदार संघ 247- मोहोळ (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 336, पुरूष 1 लाख 73 हजार 121, महिला- 1 लाख 58 हजार 329, तृतीयपंथीय -08, एकुण 3 लाख 31 हजार 458, सैनिक मतदार-424, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 159.

 

मतदार संघ 248-सोलापूर शहर उत्तर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 289, पुरूष 1 लाख 62 हजार 467, महिला- 1 लाख 66 हजार 59, तृतीयपंथीय -46, एकुण 3 लाख 28 हजार 572, सैनिक मतदार-81, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 128.

 

मतदार संघ 249- सोलापूर शहर मध्य, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 304, पुरूष 1 लाख 70 हजार 509, महिला- 1 लाख 76 हजार 115, तृतीयपंथीय -53, एकुण 3 लाख 46 हजार 677, सैनिक मतदार-45, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 809.

 

मतदार संघ 250- अक्कलकोट, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 396, पुरूष 1 लाख 96 हजार 577, महिला- 1 लाख 86 हजार 869, तृतीयपंथीय -43, एकुण 3 लाख 83 हजार 479, सैनिक मतदार-434, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 342.

 

मतदार संघ 251-सोलापूर दक्षिण, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 367, पुरूष 1 लाख 95 हजार 751, महिला- 1 लाख 86 हजार 964, तृतीयपंथीय -39, एकुण 3 लाख 82 हजार 754, सैनिक मतदार-240, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 356.

 

मतदार संघ 252-पंढरपूर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 357, पुरूष 1 लाख 91 हजार 464, महिला- 1 लाख 82 हजार 194, तृतीयपंथीय -26, एकुण 3 लाख 73 हजार 684, सैनिक मतदार-541, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 330.

 

मतदार संघ 253-सांगोला, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 309, पुरूष 1 लाख 72 हजार 704, महिला- 1 लाख 60 हजार 784, तृतीयपंथीय -05, एकुण 3 लाख 33 हजार 493, सैनिक मतदार-886, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 223.

 

मतदार संघ 254-माळशिरस (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 345, पुरूष 1 लाख 80 हजार 322, महिला- 1 लाख 69 हजार 214, तृतीयपंथीय -32, एकुण 3 लाख 49 हजार 568, सैनिक मतदार-400, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 699.

 

एकूण मतदार केंद्र 3 हजार 738 व एकूण मतदार संख्या 38 लाख 48 हजार 869

एकुण मतदान केंद्रांची संख्या – 3 हजार 738, पुरूष 19 लाख 71 हजार 831, महिला- 18 लाख 76 हजार 728, तृतीयपंथीय -310, एकुण 38 लाख 48 हजार 869, सैनिक मतदार-4 हजार 436, 85 वर्षावरील मतदार- 52 हजार 766.

 

दि. 29/10/2024 रोजी एकूण पुरूष मतदार 19,71,831, स्त्री मतदार 18,76,738 व इतर मतदार 310 असे एकूण 38,48,869 एवढे मतदार व 4436 सैनिक मतदार आहेत. जिल्हयाचा EP ratio  दि. 29/10/2024 रोजी 78.67% एवढा आहे. Gender ratio  हा 952 आहे. जिल्हयामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार 1,04,634 (2.72%) असून 20-29 वयोगटातील मतदार हे 8,10,471 इतके आहेत. 85 वर्षावरील मतदारांची संख्या हि 52,766  असून दिव्यांग (PWD) मतदार संख्या हि 29,989 इतकी आहे.

 

            सोलापूर जिल्हयामध्ये एकूण मतदान केंद्र 3738 (शहरी 1183 व ग्रामीण 2555) असून, 3723 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. एकूण मतदान केंद्रापैकी 2305 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण 6469 बॅलेट युनिट, 4541 कंट्रोल युनिट 4914  व्ही व्हीं PAT मशीन आवश्यक आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे आवश्यक साहित्य घेऊन रवाना झालेले आहेत. यासाठी 502 बसेस सत्तर मिनी बसेस 198 जीपचा वापर करण्यात आलेला आहे.

 

अकरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी एकूण 18 हजार 20 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

     जिल्हयातील 11 विधानसभा मतदार संघात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज आहे तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून आपले बहुमूल्य मत मतदानाद्वारे नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button