आता फक्त महाराजस्व नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान. – Jansanvad
ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक-सांस्कृतिक

आता फक्त महाराजस्व नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान.

जनसंवाद/मुंबई, दि. २६ : महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात यापुढे महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, या अभियानाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षातील किमान चार वेळा मंडळस्तरावर अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात येईल.

 समाधान शिबिरांमध्ये जातीचे, उत्पन्न व रहिवासी दाखले, सातबारा, फेरफार, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, महसूल विभागाच्या विविध सेवा, विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे तसेच पीएम किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत पहिल्यांदाच प्रत्येक महसूल मंडळावर अंतर्गत आयोजित शिबिराला २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदनातद्वारे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button