आता आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होणार – Jansanvad
ताज्या बातम्या

आता आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होणार

नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुखांसाठी आपले सरकार पोर्टल विषयी प्रशिक्षणाचे आयोजन

सोलापूर, दिनांक 21(जिमाका):- नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार 2.0” हा शासनाचा महत्वपुर्ण प्रकल्प आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार 2.0 पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत करून दिला पाहिजे, असे आवाहन ई- गव्हर्नसचे तंत्रज्ञ देवांग दवे यांनी केले.

       नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित आपले सरकार 2.0 पोर्टल  तक्रार निवारण प्रणालीची कार्यपद्धतीबाबत विशेष प्रशिक्षणात श्री. दवे मार्गदर्शन करत होते.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलिस उपायुक्त विठ्ठल कुबाडे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, तंत्रज्ञ समीर काळे यांचेसह सर्व संबंधित यंत्रणांना प्रमुख तसेच ऑनलाईन द्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही उपस्थित होते.

परफेक्ट ब्युटी केअर, स्पा & ट्रेनिंग सेंटर

      श्री. दवे पुढे म्हणाले की, आपले सरकार 2.0 पोर्टल माहे जुलै 2024 मध्ये लाँच झालेले आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता यावी. तसेच  प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी “आपले सरकार 2.0” ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

सद्य स्थितीत सोलापूर जिल्ह्यात 7 हजार 265 तक्रारी असून त्यातील 3 हजार 52 तक्रारीचा निपटारा करण्यात आलेला असून  4 हजार 213 तक्रारी प्रलंबित आहेत. या सर्व तक्रारी पुढील दोन आठवड्यात सोडवावे असेही त्यांनी सूचित केले.

     आपले सरकार ही एक क्रांतिकारक ऑनलाईन तक्रार पोर्टल आहे जी सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करते. पारदर्शक, वापरकर्ता-अनुकूल व्यासपीठ उपलब्ध करून देते. आपल्या नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी आणि वेळेवर निराकरण शोधण्यासाठी सक्षम करते. या उपक्रमाचे महत्व अनमोल आहे, कारण हे शासनाच्या उत्तरदायित्वाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे, असे या पोर्टलचे महत्व श्री. दवे यांनी सांगितले.

       नागरिकांसाठी आपले सरकार थेट आणि कार्यक्षम चॅनेल प्रदान करते ज्याद्वारे ते त्यांच्या तक्रारींचे निराकरण करू शकतात. ही प्रणाली सरकारच्या कार्यालयात अनेक वेळा भेट देण्याची गरज दूर करते, वेळ आणि मेहनत वाचते, प्रत्येक तक्रारीचे ट्रॅकिंग आणि निराकरण सुनिश्चित केले जाते, त्यामुळे शासनावर विश्वास निर्माण होतो. अखेरीस, आपले सरकार पोर्टल हे लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारण करण्यासाठी शासनाची कटिबध्दता दर्शवत आहे, असे श्री. दवे यांनी सांगून अधिकाऱ्यांसाठी आपले सरकार कार्यक्षमतेने राबविणे अत्यंत महत्वाचे आहे.  हे फक्त सार्वजनिक तक्रारींचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने वाढवत नाही, तर जबाबदारी आणि उत्तरदायित्वालादेखील प्रोत्साहन देते. ही प्रणाली डेटा विश्लेषणाद्वारे मौल्यवान माहिती प्रदान करते, जी पुनरावृत्ती होणाऱ्या समस्यांची ओळख करून देऊन प्रणालीतील समस्यांचे निराकरण करण्यातस मदत करते. अशा डिजिटल उपायांचा अवलंब करून, नवोपक्रम आणि सार्वजनिक सेवेत उत्कृष्टतेसाठी बांधिलकी दर्शवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

     पोर्टलवर आलेल्या तक्रारींचा निपटारा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत करावा कोणतेही तक्रार जास्तीत जास्त 21 दिवसात निकाली काढावी. जो विभाग जे अधिकारी पोर्टल वरील तक्रारींचा निपटारा वेळेत करत असतील अशा अधिकाऱ्यांना नागरिकांकडून चांगल्या प्रकारचे रेटिंग मिळू शकते. या नवीन पोर्टलमध्ये शासकीय कार्यालय, विभाग व अधिकारी यांच्यासाठी नागरिकांकडून रेटिंगची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकारे श्री. दवे यांनी आपले सरकार 2.0 पोर्टल बाबत सविस्तर प्रशिक्षण उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button