माढा-करमाळारणसंग्रामराजकीयसोलापूर जिल्हा
लोकप्रिय नेत्याचा विकासप्रिय उमेदवारास पाठिंबा, मनसेच्या पाठिंब्यामुळे करमाळ्यात संजयमामा शिंदेंचे पारडे जड
जनसंवाद/करमाळा : महाराष्ट्रात अत्यंत चुरशीच्या लढती असलेल्या विधानसभा मतदार संघात करमाळा मतदार संघाची गणना होते. करमाळा मतदार संघात मनसेचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने करमाळा मनसे (MNS) कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल (दि.९) करमाळा मनसेचे तालुकाध्यक्ष संजयबापु घोलप (sanjay Bapu Gholap) यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांना पाठिंबा जाहीर केल्याने अखेर मनसेची भूमिका स्पष्ट झाली.
करमाळा तालुक्यातील अनेक गट-तट इकडून तिकडे येताना आणि जाताना दिसत असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संजयबापू घोलप यांनी संजयमामा शिंदे यांना दिलेला पाठिंबा निर्णायक ठरू शकतो अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे.
संजयामामा शिंदे यांच्या कार्यकाळात जिथे काम चांगले वाटले तिथे आम्ही कौतुक पण केले आणि जिथे आवश्यकता वाटली तिथे उघडपणे विरोध पण केला. त्यांना मिळालेल्या कमी कालावधीत जास्त निधी आणण्याची धमक संजयमामा शिंदे यांच्यात असल्याचे त्यांच्या कार्यकाळात पाहिले आहे.
तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसीमध्ये मोठे प्रकल्प आणणे, शेतकऱ्यांना अखंड, वीज, पाणी, रस्ते, करमाळा शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता या विकासकामांसाठी आम्ही संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे : संजय बापू घोलप – करमाळा तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
संजय बापू घोलप यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवातच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर झालेली आहे. त्यामुळे संजय घोलप यांच्याशी सर्वसामान्य मतदार जोडला गेलेला दिसतो. आरोग्य, रस्ते, नागरिकांची शासकीय कार्यालयात रखडलेली कामे, शेतकरी, विद्यार्थी, युवक, युवती, व्यापारी, वृद्ध नागरिक, महिला यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सातत्याने करीत आलेले आहेत. संजय घोलप हे जनमनात रुजलेले व्यक्तिमत्त्व असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक संजय घोलप यांच्याशी जोडला गेलेला आहे.
तालुका प्रशासनावर असलेली पकड, मनसे स्टाईलने केलेली, जिल्ह्यात गाजलेली आणि यशस्वी झालेली आंदोलने यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संजयबापू आपला माणूस वाटतो ही जमेची बाजू लक्षात घेता करमाळा मनसेने संजयमामा शिंदेंना दिलेला पाठिंबा निर्णायक ठरू शकतो.