अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी – Jansanvad
गुन्हेगारीसोलापूर

अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक संपन्न

 सोलापूर दि.25 (जिमाका):- जिल्ह्यात अंमली पदार्थ  वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी  पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन  कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा,असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले.

         जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी  जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची पोलीस अधीक्षक कार्यलय सोलापूर (ग्रामीण ) येथे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय प्रतिनिधी अभिजित धेटे, उपसंचालक  औद्योगिक सुरक्षा संचालनालय ओम भांडेकरी, सहा. आयुक्त समाज कल्याण एस.एम.शिंदे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ किरण चव्हाण,  पोलीस आयुक्त शहर कार्यालय क्षिरसागर , अन्न वऔषध प्रशासन कार्यालय द.रा विरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मिलींद कारंजकर , राज्य उत्पादन शुल्कचे जगन्नाथ पाटील , केंद्रिय गुप्त वार्ताचे‍ वासुदेव अपसिंगेकर, नायब तहसिलदार (गृह शाखा ) बालाजी बनसोडे, सहा. पोलीस निरिक्षक (ग्रामिण) विशाल वायकर तसेच शासकीय विभाग प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी  जनजागृतीवर भर देण्यात यावा. अंमली पदार्थांची वाहतुक रोखणे यासाठी संयुक्त कारवाई होणे अपेक्षित आहे. याबाबत गुप्त माहिती घेऊन प्रतिबंध करणे, ही उपाययोजना करीत असतांना समाजात जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनते विरोधात प्रबोधन करावे. तसेच खाजगी डॉक्टरर्स मानसपोचार तज्ञ यांच्या मदतीने जनजागृती करून अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रूग्णांना समुपदेशन करावे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांनी केमिकल कारखाने तसेच बंद पडलेले कारखाने यांना भेटी देऊन तपासणी करावी. जिल्ह्यातील शहरी -ग्रामिण भागातील सर्व औषध विक्रेते दुकानाची वेळोवेळी अन्न औषध प्रशासानाने तपासणी करावी. शाळा महाविद्यालये,विद्यापिठ आदी ठिकाणी विद्यार्थी यांच्या मध्ये जनजागृती करावी. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने समाजात अमली पदार्थां विरोधी जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या

           तसेच अमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकी संबंधी  माहिती मिळाल्यास पोलीस विभागाने विकसित केलेल्या क्यूआर कोड वर माहिती द्यावी संबधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असेही  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button