ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

PWD Kurduwadi: निकृष्ट कामाची तक्रार करुनही काम सुरूच; अधिकारी, कर्मचाऱ्यांविना कार्यालय ओस.

सा.बां.उपविभाग कुर्डूवाडीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकारी, कर्मचारी गायब.

  • अधिकारी कामावर ही नाहीत, कार्यालयात ही नाहीत आणि रजेवरही नाहीत 

जनसंवाद/कुर्डूवाडी, दि.११ : उजनी मा. (ता.माढा) येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडीच्या अंतर्गत काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. सदरील काम अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसल्याची तक्रार देऊनही अधिकारी सदरील कामाकडे फिरकले नाहीत. मात्र अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष महादेव साबळे यांनी दिली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील उजनी (मा) या गावी सार्वजनिक बांधकाम उपविभाग विभाग (PWD)च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे काम सुरू आहे, परंतु बांधकाम विभाग कुर्डुवाडीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते काम अतीशय निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाज पत्रकानुसार होताना दिसत नाही. संपूर्ण काम हे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत मनमानी पद्धतीने केले जात आहे. टेस्ट रिपोर्ट घेतला जात नाही, डस्ट, सिमेंटचा दर्जा तपासला जात नाही. काँक्रिट करत असताना प्लास्टिक पेपर वापरला जात नाही. केलेल्या कामावर पाणी मारलं जात नाही. याबाबत श्री.साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी यांना निवेदनाद्वारे कळविले होते.

 

निकृष्ट कामाची तक्रार करण्यासाठी काल (मंगळवार दि.१०) वंचित बहुजन आघाडीचे माढा तालुका अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कुर्डूवाडी येथील कार्यालयात गेले असता धक्कादायक बाब समोर आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत एकही कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे श्री. साबळे यांनी जनसंवाद शी बोलताना सांगितले. रामभरोसे चालणारा कारभार चिंताजनक असून लवकरच अशा कामचुकार व उर्मट कर्मचाऱ्याच्या विरोधात मोठं जनआंदोलन छेडणार असल्याचेही साबळे यांनी सांगितले.

 

यापूर्वीही अनेक वेळा कार्यालयात अधिकारी नसल्याचे आढळून आले आहे. सलग ७-७ दिवस अधिकारी कार्यालयात जात नाहीत. फोन केला असता मीटिंगमध्ये किंवा साईटवर असल्याचे सांगितले जाते. कोणत्या साईटवर आहे हे मात्र सांगितले जात नाही. त्यावर कहर म्हणजे शक्यतो कोणत्याच साईटवर अधिकारी सहसा आढळून येत नाहीत. कोणत्याही कामावर कोव्हाही भेट दिल्यास फक्त कामगार दिसून येतात. कामावर अभियंत्याचा पत्ताच नसतो असे नागरिकांतून नेहमी ऐकण्यास मिळते.

०००

जनसंवादकडून आवाहन – आपल्या परिसरात जर कुठे भोंदूगिरी सुरू असेल तर पुराव्यासह आम्हाला कळवा.

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क: 9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button