जनसंवाद: स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – एसएफआय सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने उपजिल्हाधिकारी महसूल विभाग मा. अमृत नाटेकर यांच्या द्वारे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य व मा. दिपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
शैक्षणिक पाठयपुस्तक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय शिक्षणाचे धर्मांधिकरण व अवमुल्यन करणारी असून भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष या तत्वाची पायमल्ली करणारी आहे. त्यामुळे या राज्य शासनाच्या निर्णयाचे एसएफआय तीव्र विरोध करत आहे.
तसेच एनटीए ने नीट परीक्षेतील केलेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघडकीस ला आलेली आहे. नीट परीक्षा ७२० गुणांची आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातात. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी चार गुण वजा होतात. त्या गुणाबरोबरच आणखी एक गुण वजा होण्याबरोबरच एकूण पाच गुण वजा होतात. अशा वेळी विद्यार्थ्यांना ७१९ आणि ७१८ गुण मिळणे अशक्य आहे. परंतु, यंदाच्या निकालामध्ये अशी उदाहरणे दिसून आली आहेत. महत्वाचे म्हणजे एकाच केंद्रातून एकसलग आसन क्रमांक असलेल्या विदयार्थ्यांना समान गुण अर्थात ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहेत. वैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण करण्याचे षडयंत्र आखत असल्याने स्पष्टपणे दिसून येत आहे. हा गैरव्यवहार व भ्रष्टाचार असल्याचा एसएफआय चा आरोप आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी करावी तसेच एनटीए ची मक्तेदारी रद्द करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावे. या दोन प्रमुख मागण्या संदर्भात शासनाने तात्काळ निर्णय घ्यावे अन्यथा एसएफआय तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आले.
यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा सहसचिव राहुल जाधव, जि.स.मं.सदस्य विजय साबळे, जि.क.सदस्य श्रुतिका बल्ला, तौसीद कोरबू आदी उपस्थित होते.