ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

स्वाभिमानीने निर्माण केलंय माढा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह.

माढा तहसील कार्यालय या दोन वर्षात वाळू, संततधार नुकसान भरपाई, दुष्काळ निधी अशा अनेक कारणांनी जास्त चर्चेत राहिले आहे.

जनसंवाद/माढा: दुष्काळ निधी, पी.एम किसान, कुणबी दाखल्यासाठीचे पुरावे, वादळी वाऱ्यामुळे झालेले नुकसान भरपाई अशा अनेक विषयांवर नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात माढा तहसील सपशेल अपयशी ठरले असल्याचे कारण देत जनतेच्या प्रश्नांवर वेळेत तोडगा न काढल्यास माढा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे तहसील कार्यालयास कळविले आहे.

 

दुष्काळ निधीसाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा दुष्काळ निधी अजूनही बऱ्याच शेतकऱ्याच्या नावावर जमा झाला नाही. वारंवार हेलपाटे मारून कधी आधार नंबर चुकला, कधी खाते नंबर चुकला असे कारणे सांगून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनच करीत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वारंवार लेखी कळवून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पी.एम किसान संदर्भात कागदपत्रे देऊनही बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडीची उत्तर मिळत आहे. कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसील कार्यालयातून कागदपत्रे काढली जात आहे त्याला पैशासाठी दप्तर दिरंगाई केली जात आहे. पैशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने निवेदनात केला आहे.

 

यावर खरं पाहिलं तर तहसीलदार यांचे नियंत्रण असण्याची गरज होती. कुठल्याही कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्यामुळे मनमानी चालू आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सध्या शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे काम चालू असल्यामुळे शाळेसाठी लागणारी कागदपत्रे प्राधान्याने देण्याची गरज असताना त्या ठिकाणीही शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या घरांचे पिकांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशा शेतकरी संघटनेने मागण्या केल्या आहेत. मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास माढा तहसील कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

 

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, सोलापूर जिल्हा प्रवक्ते मालोजी आडकर सर, माढा तालुका कार्याध्यक्ष नवनाथ उबाळे, चंद्रकांत कुट्टे मेजर, खारे व इतर शेतकरी उपस्थित होते.

०००

जनसंवादकडून आवाहन – आपल्या परिसरात जर कुठे भोंदूगिरी सुरू असेल तर पुराव्यासह आम्हाला कळवा.

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क: 9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button