अक्कलकोटताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमंगळवेढामहाराष्ट्रमाढा-करमाळामाळशिरसमोहोळराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर
जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू, काय आहेत नियम जाणून घ्या.

सोलापूर दि.21 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. त्याअनुषंगाने विधानसभा दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. सदरची निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्हयातील विधानसभा मतदार संघासाठीच्या मतमोजणी कामी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणा-या उमेदवारांचे सोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करीता सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 निवडणूकीसाठीच्या मतमोजणीसाठी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी खालील विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे करीता खालील नमुद केलेली कृत्ये करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.
244 –करमाळा विधानसभा मतदारसंघ- मतमोजणी केंद्राचे ठिकाण -शासकीय धान्य गोदाम, करमाळा
245-माढा- विधानसभा मतदारसंघ –मतमोजणी केंद्राचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, अकुलगांव, कुर्डूवाडी
246 –बाशी विधानसभा मतदारसंघ –मतमोजणीचे ठिकाण- शासकीय धान्य गोदाम, उपळाई रोड, बार्शी
247 -मोहोळ (अजा) विधानसभा मतदारसंघ –मतमोजणीचे ठिकाण – शासकीय धान्य गोदाम, पुणे सोलापूर रोड, BSNL जवळ मोहोळ
248-सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ-मतमोजणीचे ठिाकण -सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर
249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ-मतमोजणी केंद्राचे ठिकाण- नुतन मराठी विद्यालय, 156-बी रेल्वे लाईन, डफरीन चौक सोलापूर
250-अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ –मतमोजणी केंद्राचे ठिकाण -नवीन तहसिल कार्यालय अक्कलकोट
251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ-मतमोजणी केंद्राचे ठिकाण -राज्य राखीव बल गट क्रं-10, विजापूर रोड सोरेगांव सोलापूर
252 -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ – मतमोजणी केंद्राचे ठिकाण -शासकीय धान्य गोदाम, कराड रोड, पंढरपूर
253-सांगोला विधानसभा मतदारसंघ –मतमोजणी केंद्राचे ठिकाण – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मुती भवन (Town Hall) सांगोला
254 -माळशिरस (अजा) विधानसभा मतदारसंघ –मतमोजणी केंद्राचे ठिकाण -महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, अकलुज
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर कुमार आशीर्वाद, यांच्याआदेशान्वये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 खाली प्रतिबंध अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन असा आदेश देतो की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परीसरात दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे-05.00 वाजलेपासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई करीत आहे.
मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परीसरात मतमोजणी कर्मचारी/पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरीक्त कोणाही व्यक्तिला प्रवेश करणेस मनाई आहे.
मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसविणेस मनाई आहे
आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणेस मनाई आहे.
मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणेस मनाई आहे. व खाजगी वाहने ही निश्चित केलेल्या वाहन तळावरच लावण्यात यावीत. (निवडणूकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकिय वाहने वगळून.)
मतमोजणी ठिकाणाच्या 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन,वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणेस मनाई आहे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून.)
मतमोजणी ठिकाणी उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणेस मनाई आहे.
मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने (शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. चा वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणेस मनाई आहे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून.)
इंन्स्ट्राग्राम, व्हॉटस्अॅप, व्टिटर, फेसबुक, इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणा-या गोष्टी पसरवण्यास मनाई करण्यात येत आहे.
मतमोजणी ठिकाणाच्या 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण, वाद्य वाजवणे, गाणी वाजविणे, गाणी म्हणणे, गुलाल उधळणेस, वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढुन मोठ्याने आवाज करण्यास, गलाल, रंग उधळणे अशा प्रकारचे गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करणेत येत आहे.
कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणा-या मजकूराचे फ्लेक्स, बोर्डस व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करणे येत आहे.