कृषीताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हा
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा ‘असा’ घ्या लाभ.
जनसंवाद :- केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-21 पासून अंमलात आहे. केंद्र शासनाने दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा विकास निधी व पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या दोन योजनांचे एकत्रिकरण करण्यास व सदर सुधारित योजना सन 2025-26 पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत लाभ अनुज्ञेय असून, या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.जी. बोरकर यांनी केले आहे.
या सुधारित योजनेचा शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी कंपन्या, वैयक्तिक उद्योजक, सेक्शन 8 नोंदणीकृत कंपन्या,सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि, सहकारी दुग्ध संघ, यांना लाभ घेता येईल.
दुध प्रक्रिया योजनेअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या दुग्ध प्रक्रिया केंद्रांमध्ये गुणवतापुर्वक व स्वच्छ आरोग्यदायी पिशवीबंद दुग्ध प्रक्रिया. विपणन पायाभूत सुविधा, दुध वाहतुक सुविधा, संशोधन आणि विकास (प्रयोगशाळा आणि उपकरणे, नवीन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण दुग्धपदार्थ विकास, अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा / केंद्र, ट्रायजेन / एनर्जी ईफिशीयन्सी इन्फ्रास्ट्रक्चर. मुल्यवर्धित दुग्धजन्य प पदार्थ निर्मितीः नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या आईसक्रिम, चीझ, अतिउच्च तापमानात दुध प्रक्रिया, सुगंधित दुध, दुध पावडर, व्हे पावडर आदी . मुल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.
मांस प्रक्रिया व मुल्यवर्धित मांस पदार्थ निर्मिती :- नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या शेळी मेंढी, कुक्कुट, वराह , म्हैस मांस प्रक्रिया केंद्र. मोठ्या क्षमतेचे एकात्मिक मांस प्रक्रिया केंद्र. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या आणि अस्तित्वात असलेल्या सॉसेज, नगेट्स, हॅम, सलामी इ. गुल्यवर्धित मांस पदार्थ निर्मिती.
पशुखाद्य निर्मिती व बळकटीकरण:- लघु, मध्यम व मोठ्या पशुखाद्य निर्मिती केंद्रांची स्थापना, खाद्य विटा (टोटल मिक्सङ् रेशन) निर्मिती केंद्र, बायपास प्रथिने निर्मिती केंद्र खनिज मिश्रिण निर्मिती केंद्र,एकात्मिक कुक्कुट प्रक्षेत्र आणि कुक्कुट खाद्य निर्मिती,समृद्ध चारा निर्मिती केंद्र, पशुखाद्य निर्मिती समवेत पशुखाद्य तपासणी प्रयोगशाळा
सुधारित योजनेंतर्गत अनुसूचित बँका, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत.पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असून जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायीक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.जी. बोरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.