ताज्या बातम्यामाढा-करमाळारणसंग्रामराजकीय

माढा करमाळा विधानसभा मतदार संघात कोण मारणार बाजी?  सर, आबा, मामा की प्रिन्स? सोशल मीडियावर खुमासदार चर्चेला आली रंगत 

जनसंवाद विशेष प्रतिनिधी : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकच आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विशेष लक्ष लागून राहिलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात देखील ११ अपक्ष व ४ पक्ष अधिकृत पक्षातील उमेदवार असून करमाळा विधानसभा मतदारसंघ नेतेमंडळींच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा बनला आहे.

त्यानुसार करमाळ्याचा किल्ला सर करण्यासाठी महाविकास आघाडी, महायुतीच्या आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांनी आणि किंगमेकरांनी सर्वस्व पणाला लावलं आहे.

प्रतिष्ठेच्या माढा करमाळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार नेमक कोण असणार, कोण बाजी मारणार याची उत्कंठा प्रचाराच्या रणधुमाळीवरून लवकरच समजणार आहे.

सद्या निवडणुकीच्या रणांगणात १५ उमेदवारांमध्ये घमासान घडणार असले तरी मुख्य लढत प्रमुख चार उमेदवारांमध्ये असणार आहे. यामध्ये एक शिक्षण सम्राट, एक पैलवान आणि दोन कारखानदारामध्ये निवडणुकीचा कलगीतुरा रंगणार आहे.

विद्यमान आमदार अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना करमाळा मतदार संघातील जनता गेटकेन उमेदवार समजत असून निसटता पराभव स्वीकारणारे पैलवान माजी आमदार नारायण पाटील, शिक्षण सम्राट प्राध्यापक रामदास झोळ आणि नव्याने शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणारे दिग्विजय बागल या चौघांचे राजकीय भविष्य घडवणारी यंदाची निवडणुक असणार आहे.

बागल आणि झोळ पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. नारायण आबा राजकारणातले मुरबी नेतृत्व मानले जात असले तरी संजयमामांचा लोकप्रियतेचा चढता आलेख माढा करमाळा संयुक्त मतदार विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण असणार आहे.

प्रा.झोळ यांचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी असणारा दांडगा संपर्क, मराठा आरक्षणाच्या दाहकतेच्या झळया कोणाला तारक किंवा मारक ठरणार? हे पहावं लागणार आहे. तर नव्याने शिव धनुष्य हाती घेणारे प्रिन्स बागल यांची पहिली विधानसभा निवडणूक नव्या राजकीय प्रवासाची दिशा ठरवणार आहे.

०००

प्रकाशक - एस.एस.वाघमारे - 9421756655  9527271389

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button