सोलापूरात विश्वतांसाठी 27 मार्चला कार्यशाळेचे आयोजन – Jansanvad
ताज्या बातम्यासोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूरात विश्वतांसाठी 27 मार्चला कार्यशाळेचे आयोजन

 सोलापूर दि.25 (जिमाका):- धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती,  धर्मादाय सह आयुक्त, पुणे  यांच्या निर्देशननुसार गुरूवार दि.27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे विश्वतांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय उप आयुक्त (प्रतिनियुक्त न्यायाधिश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी दिली आहे.

               सदर  कार्यशाळेत संस्था नोंदणी अधिनियम ,1860 व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये विश्वतांना दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणात विविध तज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  शंभर  दिवसांचा कृति आराखडा’  च्या अनुषंगाने क्षेत्रिय शासकीय व निमशासकी  कार्यालयांसाठी 100 दिवसांसाठी 7 कलमी  कृति आराखडा प्रमाणे सुकर जीवनमान  नागरीकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचिलित कामकाजाच्या पध्दतीचे पुनर्विलोकन करून प्रशासकीय पध्दतीमध्ये  किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने द्याव्यात .  नागरीकांचे  दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता सातत्याने प्रयन्त करावेत  या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

               तरी विश्वतांना या कार्यशाळेस जास्तीत जास्त संखेने  उपस्थित राहवे असे, आवाहन धर्मादाय उप आयुक्त, (प्रतिनियुक्त न्यायाधिश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button